Google Ad
Editor Choice

धोका वाढतोय : पिंपरीत नायजेरियाहून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४डिसेंबर) : पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरिया हून आलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले आणखी दोघे पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे आत्तापर्यंत नायजेरियाहुन आलेले 3 आणि त्यांच्या संपर्कातील 3 असे सहाजण पॉझिटिव्ह आलेले आहेत. या सर्वांचे नमुने हे ओमीक्रोन व्हेरिएन्ट तपासणीसाठी जिनोमिक सिक्वेसिंगसाठी करिता पाठविण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडं पुण्यात परदेशातून आलेल्या 17 जणांची आरटीपीसी टेस्ट करण्यात आली होती. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

यापूर्वी आफ्रिकेतील नायजेरिया देशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघे जण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या एक जण असे तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी कॅम्पातील नवीन जिजामाता रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना होम आयसोलेट करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली होती.

Google Ad

राज्य शासनाच्या सूचनेवरून परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.  नायजेरियातून दोघे जण गुरूवारी (दि.25) पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यांची कोरोना चाचणी केली असता सोमवार (दि.29) त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तसेच त्यांच्या संपर्कातील एका व्यक्तीचा अहवाल मंगळवार (दि.30) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  त्या तिघांना पालिकेच्या जिजामाता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे संपर्कामधील नागरिकांना होम आयसोलेट केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!