महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : गावठी कट्टे , पिस्तुल घेऊन फिरणारे वारंवार पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पकडत आहेत आज आणखी एकाला पकडण्यात आले. सोन्या कदम असे त्याचे नाव असून तो अवघ्या २४ वर्षाचा आणि रेकोर्ड वरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’युनिट १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खडक पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार आरोपी व पाहिजे/फरारी आरोपी चेक करीत असताना युनिट १ कडील पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, त्रिकोणी गार्डन जवळ, भवानी पेठ पुणे या ठिकाणी एक इसम उभा असून त्यांचेकडे पिस्टल हे शस्त्र असून तो कोणता तरी गंभीर स्वरुपाचा दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदरची बातमी युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना कळवले असता त्यांनी लागलीच सदर ठिकाणी स्टाफसह जावुन मिळालेल्या बातमी बाबत योग्य ती काळजी घेवुन बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याच्या मार्गदर्शक सुचना दिल्या.
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार, पंच व बातमीदार असे हे सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पाहणी करता बातमीदाराने लांबुनच एका इसमास दाखविले. तो त्रिकोणी गार्डन जवळ, फुटपाथवर, भवानी पेठ पुणे संशयास्पदरीत्या उभा असलेला दिसला. तो सतत इकडे तिकडे पाहत होता.
बाबत आमची व पंचाची खात्री होताच त्यास स्टाफच्या मदतीने त्यास पोलीस असले बाबतची चाहुल लागु न देता व त्यास पळण्याची संधी न देता छापा टाकुन आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेतले. त्यास सपोनि आशिष कवठेकर यांनी पंचासमक्ष नांव पत्ता विचारता त्याने आपले नाव प्रथमेश उर्फ सोन्या दिपक कदम, वय २४ वर्षे, रा. चव्हाण शाळे समोर, महादेव मंदिरा शेजारी, दुष्काळ वस्ती, धायरी गाव, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यास या ठिकाणी येण्याचे कारण विचारता तो योग्य कारण सांगण्यास असमर्थ ठरला व तो कावरा बावरा झालेचे दिसुन आले. त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता झडती मध्ये त्याचे नेसते पॅन्टमध्ये कंबरेस डावे बाजुस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह मिळुन आले. ते पंचासमक्ष ताब्यात घेवुन सपोनि आशिष कवठेकर यांनी त्याचे मॅगझीन खोलून पाहता त्यामध्ये ०१ जिवंत काडतुस मिळुन आले. त्याच्याकडुन ६०,०००/- रु किंचे एक गावठी
व १०००/- रु किंचे ०१ काडतुस असे एकुण ६१,०००/- रु किंचा माल जप्त करुन त्यांच्या विरुध्द खडक पो.स्टे. गु.र.नं.४००/२०२३ आर्म अॅक्ट ३/२५, महा, पो. अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्रषक मेश तापकीर युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत.
सदर आरोपी विरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सिहंगड रोड पोलीस ठाणे येथे दाखल आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार,सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक ,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे मा.पोलीस उप- आयुक्त, गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक रमेश तापकीर, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, आण्णा माने, निलेश साबळे, अजय थोरात, अनिकेत बाबर, महेश बामगुडे, शुभम देसाई, अभिनव लडकत, शंकर कुंभार यांनी केली आहे.