Google Ad
Uncategorized

सांगवी तपास पथकाची आणखी एक कामगिरी … रावण टोळीतील सराईत व सक्रिय आरोपीकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : दि. ०२/०९/२०२४ रोजी सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, पो.ना. १५३४ यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर जुनी सांगवी पुणे येथे एक इसम थांबला असुन त्याने कमरेला पिस्तुल लावलेले आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सदरबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो, सांगवी पोलीस स्टेशन यांना कळवुन त्यांनी सदर इसमास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेने सांगवी पोलीस स्टेशनकडील तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक ताकमाते यांनी टीम तयार करुन सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिकेत ऊर्फ सोन्या अशोक बाराथे, वय २४ वर्षे, रा. शिवाजी महाराज पुतळ्या मागे, बाराथे वस्ती, दापोडी पुणे. असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस मिळुन आले.

पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याविरुध्द सांगवी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ३५९/२०२४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी १) सांगवी पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ३७८/२०२०, भा.द.वि. कलम ३०२,३४ व २) सांगवी पोलीस स्टेशन गु.रजि.नं. २५०/२०१८, भा.द.वि. कलम ३२६.३४ गुन्हे दाखल आहेत. तसेच तो रावण टोळीतील सक्रिय गुन्हेगार आहे.

Google Ad

गेल्या ०७ दिवसामध्ये सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकाने एकुण ५ पिस्तुल व ०५ जिवंत काडतुसे जप्त करुन उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार बौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ श्रीमती स्वप्ना गोरे, मा. सहा. पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री. सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश बनसोडे, पोलीस उप निरीक्षक ताकभाते, सहा. पोलीस फौजदार वाघुले, पौहवा ७३९ शिंदे, पोहवा ९४८ साळवे, पोहवा १००४ ढवळे, मोहवा १११० सुपे, पोहवा ११९४ गायकवाड, पौहवा १५१२ गोडे, पौहवा १५३५ गोरे, पो.ना. १५३४ पाटील, पो. कॉ. २००४ मोघे, पो.कॉ. २०११ पाटील, पो.कॉ. २२०९ डंगारे, पो.कॉ. ३५३८ पाईकराव यांचे पथकाने केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!