Google Ad
Uncategorized

संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ एप्रिल) : वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा शनिवारी करण्यात आली.यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होईल. पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी पालखी सोहळ्याबाबतची माहिती दिली. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.

संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतीक्षा करीत असतात. मागील वर्षी कोरोना महामारीची लाट ओसरल्यानंतर पारंपरिक पद्धतीने वारी सुरू करण्यात आली होती. इनामदार वाड्यात पालखी पहिला मुक्काम करणार आहे. यंदा संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरसाठी निघणार आहे. 28 जून रोजी पालखी पंढरीत दाखल होणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जूनला तुकोबांची पालखी सहभाग घेणार आहे. प्रत्यक्षात याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट घडणार आहे.

Google Ad

पालखी मार्गाचे काम सुरूसंत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण केले जाईल आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी त्याचे लोकार्पण होऊन तो मार्ग सुरू होईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मागील महिन्यात म्हटले होते. येत्या मे महिन्यापर्यंत या दोन्ही मार्गांचे मिळून सुमारे 60 ते 70 टक्के काम पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली होती. या मार्गांवरील दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येत आहेत आणि वारकर्‍यांचे पाय भाजू नयेत, याची काळजी घेण्यात येत आहे. या पालखी मार्गावर ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे गडकरी म्हणाले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!