Google Ad
Editor Choice

जुनी सांगवी येथील अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथे अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन व स्नेहमेळावा उत्साहात साजरा करण्यात आला . गेली दोन वर्षांपासून कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना आलेली बंदी, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडत यावर्षी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले .

Google Ad

कोरोनाच्या बिकट काळाचा सर्वांनाच या संकटाचा सामना करावा लागला . यातून सावरत असताना ज्येष्ठांनी आनंदी निरामय जिवनासाठी स्वतःकडे लक्ष देत व्यायाम , आहार , मनोरंजन याकडे लक्ष द्यावे असे मत जुनी सांगवी येथे अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात बोलताना सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी व्यक्त केले .

यावेळी पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण बागडे , संजोग वाघेरे , प्रशांत शितोळे , ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब ढमाले , नाना काटे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाबासाहेब ढमाले यांनी केले . तर आभार जालिंदर देवकाते यांनी मानले .

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!