Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

झोपडपट्टीवासीयांसह अन्य वंचित घटकांना पिंपरी चिंचवड मनपातर्फे त्वरीत आर्थिक मदत मिळावी … स्वीकृत सदस्य अनिकेत काटे यांची आयुक्तांकडे मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.०४मे ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच तळागाळातील घटकांना कोरोनाच्या महामारीमुळे उपासमारीचा सामना करावा लागत आहे.मनपा हद्दीतील बहुतांश नागरिक हे झोपडपट्टीधारक असून या झोपडपट्टीधारकास महापालिकेतर्फे प्रति घरटी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी ‘ह’ प्रभाग स्वीकृत नगरसदस्य अनिकेत राजेंद्र काटे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात अनिकेत काटे यांनी म्हंटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉंकडाऊन लावण्यात आला. महापालिका क्षेत्रातही कडक निर्बंध असल्याने रोजगार उपलब्ध नसल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. झोपडपट्टीधारक तसेच अन्य वंचित घटकांवर उपासमारीची वेळ आल्याने पालिका प्रशासनातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक मदत देण्याकरिता प्रशासनाने नुकतीच योजनाही जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या जाचक नियम व अटीमुळे या घटकांना त्वरीत आर्थिक मदत मिळणे कठीण झाले आहे.

Google Ad

कारण नोंदणीकृत घरेलू कामगारांकरिता रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक करण्यात आले असून मनपा हद्दीतील व अघोषित अशा झोपडपट्टीमधील असंख्य घरेलू कामगार ,मोलकरीण तसेच अन्य घटक हे अशिक्षित असून त्यांना नोंदणी करण्यासाठी अडचणी येत आहेत. हे सर्व घटक नियमित करदाते आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळण्याकरिता जाचक अटी रद्द कराव्यात तसेच त्यांच्यासाठी कांही पर्यायी व्यवस्था करावी अशी विनंती अनिकेत काटे यांनी केली. दरम्यान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच तळागाळातील अन्य नागरिकांसाठी त्वरीत कोविड लसीकरण करण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणीही काटे यांच्याकडून करण्यात आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!