Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

मालकीनेने कामावरून काढल्याचा राग अनावर … कामगाराने मालकिणीला पेटवलं … होरपळून दोघांचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ एप्रिल) :पुणे शहरातील वडगाव शेरीमध्ये धक्कादायक घटना घडली. कामावरुन काढल्याच्या रागातून एकानं महिलेला पेटवून दिलं. यामध्ये महिलेला पेटवून देणाराही आगीत होरपळला. आगीत होरपळेल्या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर दोघांचाही भाजून मृत्यू झाला आहे.

एका टेलरिंग दुकानात काम करणाऱ्याला त्याच्या मालकिणीनं कामावरुन काढून टाकलं होतं. याचा राग मनात ठेवून या कामगारानं आपल्या मालकिणीवर आधी पेट्रोल टाकलं. त्यानंतर तिला पेटवून दिलं. या धक्कादायक घटनेमध्ये महिलेला पेटवून देणारा कामगारही प्रचंड होरपळला. त्याच्याही शरीरानं पेट घेतला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या दोघांचा या धक्कादायक घटनेमध्ये मृत्यू झाला. वडगाव शेरीमध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी या दोन्ही जखमी झालेल्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली.

Google Ad

चंदन नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद नाथसागर हा 35 वर्षांचा इसम टेलरिंगची नोकरी करत होता. बाला नोया जोनिंग या 32 वर्षांच्या महिलेच्या टेलरींगच्या दुकानामध्ये तो कामाला होता. दरम्यान, बाला नोया जोनिंगनं मिलिंदला कामावरुन काढून टाकलं होतं. त्यानंतर प्रचंड संतापात असलेल्या मिलिंदने टोकाचं पाऊल उचललं. आधी त्यानं बाला नोया जोनिंगच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. नंतर स्वत:देखील तो या आगीमध्ये होरपळला.

या संपूर्ण घटनेत एक प्रथमेश नावाचा एक जण या सगळ्यात गंभीर जखमी झाला. आगीची घटना घडली, तेव्हा वाचवण्यासाठी गेलेल्या प्रथमेशला गंभीर जखमा झाल्यात. दोघांना वाचण्यासाठी गेलेल्या जखमी प्रथमेशवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून घेतला आहेत. पोलीस इन्स्पेक्टर सुनिल जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मिलिंद हा मूळचा परभणीचा आहे. तो गेल्या आठ वर्षांपासून या महिलेचा दुकानात नोकरी करत होता. टेलरचं काम करणाऱ्या मिलिंदला नोकरीवरुन काढल्याचं सहन नाही झालं आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं. सात दिवस अगोदर त्याला नोकरीवरुन काढण्यात आलं होतं. टोकाचं पाऊल उचलण्याआधी मिलिंदनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्टेटही बदलले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!