महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मे) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत अग्निशस्त्राचा वापर करुन गंभीर गुन्हें घडत असल्याने, त्यास प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने, मा. पोलीस आयुक्त यांनी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेशीत केल्याने खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असतांना पोलीस अंमलदार आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना मिळालेल्या बातमीवरून, रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करण्यात आले आहे.
आरोपी सुनिल बाळासाहेब खेंगरे वय ३८ वर्षे रा. साठे कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे व त्याचा साथीदार अभिजीत अशोक घेवारे वय ३५ वर्षे रा.भाग्यश्री शर्मा याचे खोलीत, हाऊस नं. १०५७/०२, विजयनगर, अल्फान्सा स्कुल समोर, काळेवाडी, पुणे यांना एस. के. वॉशिंग सेंटर समोर, मुंजोबा वसाहत, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर, चिंचवड, पुणे येथुन ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन किं.रु. १,२०,६००/-रु. चे ०३ देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे ( राऊंड) जप्त करण्यात आले.
त्याचे विरुध्द चिंचवड पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. अटक आरोपी सुनिल बाळासाहेब खेंगरे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे.