Google Ad
Uncategorized

राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट समोर … राज्यातील विधानसभा निवडणुका वेळेत होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले संकेत, वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० सप्टेंबर) : राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक वेळेत होणार असल्याचे संकेत मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी वेळेतच तयारी सुरु करावी लागणार आहे.

राज्याचे मुख्य अधिकारी १३ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढाव घेणार असल्याचे निश्चित झालं आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहे. अधिकारी हे निवडणूक कर्मचारी, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र, मतदार यादी, कायदा आणि सुव्यवस्था , मतदान साहित्य याचा आढावा घेणार आहेत.

Google Ad

दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार असल्याचं निश्चित झालं आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेणार आहेत. अधिकारी नागपूर विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग, मुंबई शहरातील तयारीचा आढावा घेणार आहेत.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!