अमृता फडणवीसांच्या ट्वीटला शिवसेनेचं तोडीस तोड प्रत्युत्तर

महाराष्ट्र 14 न्यूज : सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर निशाणा साधताना मुंबईतील सुरक्षिततेवर व पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुंबई पोलिसांवर भरवसा नसेल तर सुरक्षा कवच सोडून द्या,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या चौकशीच्या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलं आहे. सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळंच देशभरातून मागणी होऊनही हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे दिले जात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्याचवेळी मुंबईत तपासासाठी येणाऱ्या बिहार पोलिसांनाही सहकार्य केलं जात नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मुंबईत नुकत्याच आलेल्या एका बिहारी पोलीस अधिकाऱ्याला महापालिकेनं क्वारंटाइन केल्यानंतर हा वाद आणखी पेटला आहे.

याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी आज एक ट्वीट केलं. ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीनं केला जात आहे, हे पाहता मुंबईनं माणुसकी गमावल्यासारखं वाटतंय. निष्पाप व स्वाभिमानानं जगणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई सुरक्षित राहिली नसल्याचं अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुंबई असुरक्षित असल्याचं सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला आहे.

अमृता यांच्या या ट्वीटला युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांचं सुरक्षा कवच घेऊन फिरता आणि त्यांच्यावरच असे आरोप करता?,’ असा संतप्त सवाल वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ‘मुंबई पोलिसांवर भरवसा नसेल तर हे सुरक्षा कवच सोडून द्या,’ असंही त्यांनी सुनावलं आहे. सरदेसाई यांच्या या ट्वीटमुळं हा वाद आणखी रंगण्याची चिन्हं आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

11 hours ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 day ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 day ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

5 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

6 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 week ago