महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २६ सप्टेंबर) : उमेदवारी मागणाऱ्यांना नव्हे तर पक्षाचे काम करणाऱ्यालाच मिळेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे नव्हे तर उमेदवारी ही पक्षच कापू शकतो, असे स्पष्ट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा असेल तर आपसांतील भांडणे मिटवा.
सरकारी योजनांचा प्रसार मनापासून करा, असा सल्ला कोअर कमिटीच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीचा उमेदवार पडणे म्हणजे विरोधी उमेदवाराला निवडून देणे असे आहे. त्यामुळे आपसांतील भांडणे मिटवून पक्षासाठी लढण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्षातील अंतर्गत वादामुळे उमेदवारी मिळणार नाही, त्यामुळे एकत्र बसून भांडणे मिटवा. मनधरणीची वेळ येऊ देऊ नका, असेही अमित शहा यांनी बैठकीत बजावले.
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही कानमंत्र दिला. आणि भाजपत तो पाळला जातो, लोकसभेच्या निवडणूकित हे मावळ मतदार संघात चिंचवड विधानसभा मतदार संघात पाहायला मिळाले . यावेळी शक्ती केंद्र अधिक सक्षम करण्याचा सल्ला देताना मागासवर्गीयांच्या वसाहतींमध्ये कार्यकर्ते जोडण्यापासून ते अँड्रॉइड मोबाईलवर व्हाट्सअप ग्रुप बनविण्याचा सल्ला दिला. या माध्यमातून शासनाच्या योजना घरोघरी पोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी १० टक्के मतदान वाढविले तरी विजय आपलाच असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार तंबी देणार का?
राज्यात महायुतीच्या जागावाटप वरून संघर्ष सुरू असताना अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये चिंचवड विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला न सुटल्यास महाविकास आघाडीत प्रवेश करू पण भाजपाचा प्रचार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा अजितदादा समर्थक नगरसेवकांनी घेतला आहे.
चिंचवड मतदार संघात आमची ताकद आहे. असे म्हणत माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी आज चिंचवड येथे पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. त्यावर आता या पदाधिकाऱ्यांना अजित पवार तंबी देणार का? आणि अजित पवारांची पॉवर पिंपरी चिंचवड शहरात चालणार का? हा आता शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…