Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास, सांगवीच्या वतीने … रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जुलै) : श्री गजानन महाराज सर्व सेवा व्यास , सांगवी यांच्या वतीने आज गुरुपौर्णिमे निमित्ताने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा लक्ष्मणरावजी जगताप ( आमदार चिंचवड मतदार संघ ) आणि सौ . उषा उर्फ माई ढोरे ( महापौरः पिं.चिं.म.न.पा. ) ह.भ.प. शांतीब्रम्ह माधवमहाराज इंगोले ( आळंदी ) तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.

श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास , सांगवी ही सामाजिक तसेच आध्यात्मीक ट्रस्ट ( न्यास ) असून या ट्रस्टने आजपर्यंत वेळोवेळी समाजाचे भान ठेऊन व निर्माण होणाऱ्या परिस्थितीला अनुसरून समाजातील व्यक्तींसाठी त्यांना सहाय्यभूत होण्यासाठी नेहमीच सकारात्मक पाऊल उचलले आहे .

Google Ad

गरजू कुटूंबाला जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा असो , रूग्णांच्या मदतीसाठी रक्तदान असो , असहाय्य व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटूंबांसाठी मोफत घरपोच जेवणाचे टिफिन असो , गरजू व गुणवंत विद्याथ्यांसाठी शालेय साहीत्याचे वाटप असो , निराधार व अनाथ , अपंग , नेत्रहिन इ . असे आश्रम चालवणाऱ्या संस्थांना त्यांच्या गरजेनुसार सढळ मदत असो , आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तींच्या शस्त्रक्रियेसाठी मदत असो , समाजामध्ये सहिष्णुता , एकता , व बंधुत्वाची जपनुक करण्यासाठी पालखीतील दिंड्यांना केलेली मदत असो , गावचे , समाजाचे हित जोपासणे ,

समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी योजलेले धार्मिक कार्यक्रम असो अथवा जेष्ठ बांधवाचे आरोग्य निरोगी / निरामय राहण्यासाठी त्यांना मार्गदर्शन होण्यासाठी आयोजीत केलेले आरोग्य शिबीरे किंवा मार्गदर्शक व्याख्याने असो तसेच गरीब व गरजू नागरिकांसाठी रूग्णालयांस उपचार सुलभ होण्यासाठी त्या रूग्णालयांना दिलेल्या बायपॅप मीनी व्हेंटीलेटर मशिन्स असो आदि उपक्रम न्यासाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवून समाजामध्ये सामाजीक , शैक्षणिक , सांस्कृतीक आणि आध्यात्मिक क्षेत्रांचा विकास होण्यास मोलाचे सहकार्य केले आहे .

आपत्कालीन परिस्थितीत देशाला सहाय्यभूत होण्यासाठी पंतप्रधान सहाय्यक निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठीही आपले योगदान दिले आहे . तसेच पूसास्तांसाठी सकाळ रिलीफ फंडालाही मदत दिलेली आहे . ” समाजाचं हित जोपासण्यासाठी ही ट्रस्ट सतत कार्यरत असते . ” गतवर्षी उद्भवलेल्या कोरोना वैश्वीक महामारीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी न्यासाने रूग्णाची निकड लक्षात घेता सर्वतोपरी सहाय्य केलेले आहे . ( वैद्यकिय सुविधेपासून ते सर्व नागरिकांना लसीकरण केंद्रावरील चहा व पाणी वाटप ) या सर्व परिस्थितीचा आढावा घेता न्यासाच्या असे दृष्टीस आले आहे की ,

वैद्यकिय उपचारासाठी किंवा स्पणालयात दाखल होण्यासाठी रूणांची फार गैरसोय होते व नाहक अधिक मुत्यही अदा करावे लागते जे गरजूंना परवडणारे नसते ही अडचण दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी न्यासाने महाराजांच्या आशिर्वादाने व सर्व भाविकभक्तांच्या सहकार्याने रुग्णवाहिका घेतती असून तिचा तोकार्पण सोहळा आज दि . २३/०७/२०२१ शुक्रवार रोजी ” गुरूपौर्णिमेच्या ” शुभमुहूर्तावर संपन्न झाला. या रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रूग्णांना रूग्णालयात ने – आण करणे सुलभ होणार आहे आणि तेही अत्यल्प दरात . पैसे कमविणे हा न्यासाचा उद्देश नसून सामाजिक बांधीतकी म्हणून ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम न्यास राबविणार आहे .

श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास सर्व नागरिकांना आवाहन करित आहे की , ज्यांना ज्यांना अॅम्ब्यूलन्सची आवश्यकता भासते त्यांनी खालील मो . नं . सपंर्क साधावा ही विनंती या कार्यक्रमावेळी केली.

🚑 संपर्क :-

▶️रुग्णवाहिका चालक
मो.नं. 7824919191

▶️रुग्णवाहिका व्यवस्थापक
श्री.ओंकार अंबुलकर – ( विश्वस्त )
मो . नं .: 7825919191

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!