आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा !
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ मार्च) : बाबुरावजी घोलप महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २००२-०३ मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थी २० वर्षानंतर पुन्हा एकत्र येत आहेत. रविवार, दि. ०२ एप्रिल २०२३ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी २००२ साली जशी शाळा भरत होती, तसा निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, तसेच मुली ही आपला शाळेचा ड्रेस घालून येणार आणि २००२ सारखा वर्ग भरणार आहे, त्या काळी जसे शाळेच्या बाहेर पेरू, चिंच आवळा, बॉबी, कुल्फीची गाडी आणि बरेच काही विक्रीसअसणार आहे, २००२ साली जसे होते अगदी तसे विक्रेते ही यावेळी पहायला मिळणार, त्यामुळे आपल्या बालपणीची शाळा, विद्यार्थी, शिक्षक या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळणार आहे.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी अविनाश खुंटे, निरज सांळूके, गणेश देवकर, सुशांत पवार, सचिन काळे, अमित दातीर, दिपक घोळे, अमित आवारे, सचिन गव्हाणे, मृणाल गणगे, स्वाती कांबळे, मालिनी धेंडे, कीर्ती पाटील, प्रमिला पवार, प्रीती काकडे, देवयानी सरोदे , स्न्हेल भिसे यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले आहे. २०० पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनी व शाळेचा संपूर्ण शिक्षकवृंद जवळजवळ २० वर्षांनंतर एकमेकांना भेटणार आहे. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…