महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ ऑक्टोबर २०२३:- अमृत कलश यात्रा उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागातून आणलेली माती आणि घराघरांतून जमा केलेले धान्य एकत्रितपणे महानगरपालिकेच्या अमृत कलशात जमा करण्यात आले असून हा कलश मुंबई मार्गे दिल्लीस पाठविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले तसेच या सर्व उपक्रमांसाठी सहभाग आणि सहकार्य केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे,शहरवासियांचे आणि अधिकारी, कर्मचा-यांचे आभारही त्यांनी मानले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने “माझी माती, माझा देश “ उपक्रमांतर्गत “अमृत कलश यात्रा उपक्रम” व “ खमरी मो सिक्किम” नौदल अधिकारी यांच्या रॅलीचा स्वागत समारंभ तसेच देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन भक्ती शक्ती चौक, निगडी येथे करण्यात आले होते, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, मिनीनाथ दंडवते, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शरद उर्फ राजू मिसाळ, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, “ खमरी मो सिक्किम” नौदल अधिकारी कॅप्टन एम सत्यनारायण मूर्ती, कमांडर सुनील शिंदे, अखिलेश विश्वकर्मा, संदीप सिंग ब्रार,लेफ्टनंट कमांडर अभिषेक वालिया, बिष्णू सर्ज,रघुनाथ सावंत, लेफ्टनंट अरविंद कृष्णन, प्रेरणा कुमारी,कॅप्टन (एमएनएस) ऐश्वर्या बी मेनन, निखीता जेम्स, दिव्या करमरकर, डॉ. किरण यादव,सुभेदार मेजर यशवंत महाडीक,लिडिंग रेडीओ ऑपरेटर डी.एच. कुलकर्णी, डाॅ.तुषार गावडे नगरसदस्य अमित गावडे, माजी नगरसदस्या शर्मिला बाबर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यानंतर सामुहिक पंचप्रण शपथ घेण्यात आली आणि ८ क्षेत्रीय कार्यालयातून आणलेले अमृत कलश अतिरिक्त आयुक्त खोराटे आणि जगताप यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
अतिरीक्त आयुक्त खोराटे यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार “माझी माती,माझा देश” अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रात आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगितले तसेच शहिदांच्या सन्मानार्थ शहरात दोन मध्यवर्ती ठिकाणी शहिदांच्या शिलाफलकांचे अनावरण, भारतीय स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहरात विविध ठिकठिकाणी ७५ देशी वृक्षांच्या लागवडीची रोपवाटिका, तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा, शहिदांच्या कुटुंबीयांचा, माजी सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करून त्यांना कृतज्ञतापूर्वक सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगून,शहरात अनेक ठिकाणी,शासकीय कार्यालयात, विविध सोसायट्यांमध्ये मातीला वंदन आणि वीरांना वंदन करण्यासाठी सामूहिक पंचप्राण शपथ घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या सैन्य भरती विषयक प्रश्नांबाबत कमांडर सुनिल शिंदे आणि सब लेफ्टनंट नेत्रा दामले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचा “झंडा उंचा रहे हमारा” हा कार्यक्रम सागर आठवाल आणि त्यांच्या सहका-यांनी सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पंचप्रण शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…