महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर) : सामाजिक आणि आर्थिक न्याय, आचार,विचार, धर्म, श्रद्धा यांचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देणारे भारतीय संविधान दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण भारतीयांनी अंगिकृत केले. आजच्या या मंगलदिनी संविधानातील अधिकार स्वातंत्र्यासोबतच कर्तव्ये आणि जबाबदारी पालनाचाही संकल्प प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भारतीय संविधान दिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानातील ‘‘उद्देशिका’’ पालन करण्याची शपथ घेण्यात आली.
यावेळी मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस वैशाली खाड्ये, भाजपा उपाध्यक्ष माऊली थोरात, शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर, नामदेव ढाके, शहर कार्यकारिणी सदस्य निता कुशारे, माजी नगरसेवक बाबा त्रिभुवन, सागर अंगोळकर, संतोष कांबळे, माजी नगरसेविका सविता खुळे, मा. स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, मंडल अध्यक्ष संदीप नखाते, निलेश अष्टेकर, प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे, आयुष्यमान भारत संयोजक गोपाळ माळेकर, ओबीसी मोर्च्याचे अध्यक्ष राजेंद्र राजापूरे, सहकार सेलचे अध्यक्ष माधव मनोरे, उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष आकाश भारती, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जांभूळकर, कृष्णा भंडलकर, श्रीकांत पवार, प्रकाश जावळकर, दीपक भंडारी, हृषीकेश कांबळे, सागर बिरारी, उज्ज्वला गावडे, सोना गडदे, नीता मुंगसे आदी उपस्थित होते.
जगातील सर्वेश्रेष्ठ राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली देशात भारतीय संविधानामुळे सामाजिक शांतता आणि समानता प्रस्तापित झाली. ‘आम्ही भारताचे लोक…’ असा विश्वास देणाऱ्या संविधान दिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधानातील अधिकारांचे स्वातंत्र्य उपभोगावे आणि कर्तव्याचे पालनही केले पाहिजे. देशाला बलशाली बनवण्यासाठी संवैधानिक मूल्यांचे जतन करण्याची आवश्यकता आहे.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
***
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑक्टोबर :- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आधार…
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…