Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मध्ये ‘अनलॉक’ सर्वच दुकाने आजपासून उघडणार … काय आहे, सुधारित आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०१जून) : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व दुकाने आज मंगळवारपासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दर सोमवार ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील नव्या निर्बंधांबाबतचा आदेश जारी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही.याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा (जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सल सुरू राहणार आहे.

Google Ad

▶️काय आहेत सुधारित आदेश :-

१. अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहातील.

२. मनपा क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहातील.

३. अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.

३. ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.

४. दुपारी ३ वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.

७. सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.

८. मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहतील.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!