Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव जवळकर नगर येथील बिल्डिंगमध्ये … लाईट मीटर मध्ये शॉर्ट सर्किट होऊन सर्व मीटर जळून खाक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि.२५ ऑक्टोबर) पहाटे ०३.०० वाजता श्रीदत्त रेसडेन्सी सिंहगड कॉलनी, जवळकर नगर या बिल्डिंगमध्ये सर्व लाईट मीटर मध्ये शॉर्ट सर्किट होऊन सर्व मीटर जळून खाक झाले. परिसरतील राजाराम माळी तसेच सोसायटीचे सदस्य युवराज महाले यांनी राहुल जवळकर यांना फोन द्वारे घटनेची महिती दिली जवळकर यांनी लगेच पिं.चिं.महानगरपालिकेच्या अग्निशामक दल तसेच mseb सांगवी विभागाला माहिती देऊन घटनास्थळी लगोलग बोलावले .

Google Ad

आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली होती की संपूर्ण बिल्डिंगच्या जिण्यामध्ये आग आणि धुर झाल्या मुळे सर्व सोसायटी मधिल सदस्य आत आडकुन होते. त्यावेळी राहुल जवळकर तसेच पारिसरतील वाघे, राजाराम माळी तसेच इतर नागरिकांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी मदत केली. बिल्डिंग चे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

पिं.चिं.महानगरपालिकेच्या अग्निशामक दल तसेच mseb सांगवी विभाग, राहुल जवळकर तसेच परिसरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्य मुळे मोटी दुर्घटना टळली, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. सोसायटीच्या सदस्यांनी जवळकर तसेच पिं.चिं.महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे तसेच mseb सांगवी विभाग तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!