महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मार्च) : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली भागातील पाटील नगर, बगवस्ती, देहू-आळंदी रोड वरील सर्वच सोसायट्यांना, तसेच चिखली मधील देहू-मोशी रोडवरील रिव्हर रेसिडेन्सी, ऐश्वर्यम हमारा सोसायटी, क्रिस्टल पर्ल, मिलेनियम पॅरामाऊंट या इतर आजूबाजूंच्या सर्व सोसायट्यांना मागील 15 दिवसांपासून खूप कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे.
‘फ’ प्रभागातील पाणीपूरवठा विभागाच्या व पिंपरी चिंचवड मनपातील पाणीपूरवठा विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना याबाबत पाठपूरावा करून देखील कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे चिखली भागातील सोसायट्यांमधील पाणीपूरवठा सुरळीत करून उदभवलेली पाणी टंचाई दूर करण्याबात आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे, यात म्हटले आहे की, आपल्या पाणीपूरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन पाणीपूरवठा सुरळीत करावा. याबाबत आपल्याशी दोन वेळेस दूरध्वनीवर बोलून समस्या सांगून झालेली आहे.

महोदय पुढील दोन दिवसात चिखलीमधील सर्व सोसायट्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आपल्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना गोट्या खेळत बसण्यासाठी गोट्या वाटपाचा कार्यक्रम केला जाईल, तसेच आपल्या कार्यालया समोर आमच्या सर्व महिला महिला भगिनींना घेऊन हंडा मोर्चा काढला जाईल याची कृपया नोंद घ्यावी .असा इशारा चिखली मोशी- पिंपरी चिंचवड हाउसींग सोसायटी फेडरेशनयांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणी पुरवठा विभागास दिला आहे. याची प्रत आमदार महेश लांडगे, भोसरी विधानसभा यांनाही देण्यात आली आहे.