महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जुलै) : पावसाळयाच्या पार्श्वभुमिवर पिंपरी चिंचवड महानगरापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायीक व क्लिनीक पॅथालॉजी लॅब यांना विजय खोराटे अतिरिक्त आयुक्त (२) पिंपरी चिंचवड महानगरपलिका पिंपरी यांनी काही सूचना जाहीर केल्या आहेत.
सध्या सुरु आलेल्या पावसाळयाच्या पार्श्वभुमिवर सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायीकांना व क्लिनिक पॅथालॉजी लॅब यांना कळविण्यात येती की, किटकजन्य व जलजन्य आजाराचा रुग्ण आढळुन आल्यास/ दाखल झाल्यास त्याची परिपुर्ण माहिती (दवाखान्याचे नाव, रुग्णाचे नाव, वय पत्ता, उपचार घेतल्याची तारीख, रिर्पार्ट तारीख) त्वरीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागास कळविणे.
महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारित) या कायदयानुसार सर्व अहवाल विहित मुदतीत कळविणे बंधनकारक आहे. त्यामध्ये :-
१)कॉलरा (पटकी) २)जापनीज इन्सेफलायटीस ३)डेंग्यु ४)संसर्गजन्य काविळ ५)गॅस्ट्रोइंट्रायटीस ६)लेप्टोस्पायरोसिस ७)मलेरीया ८) चिकुनगुनिया
९)शासन अधिसुचित करेल असे आजार इत्यादी आजारांचा समावेश असुन आपले रुग्णालयामध्ये रुग्ण आढळुन आल्यास/दाखल झाल्यास त्याची वरीलप्रमाणे परिपुर्ण माहिती खालील संबधित झोनल रुग्णालयाच्या ई-मेल आयडीवर व त्यानंतर लेखी स्वरुपात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संबधित झोनल रुग्णालयास कळवावी.
सबब, आपल्याकडुन वेळेत माहिती देण्यास, टाळाटाळ झाल्यास किंवा दुर्लक्षित झाल्यास महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम २०२१ सुधारित तसेच साथरोग अधिनियम १८९७ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र असाल कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाने केले आहे.
सोबत झोनल रुग्णालय प्रमुख यांचे संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी –
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २७ ऑगस्ट २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना सक्षम आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :-- पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी…
अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून-…