Google Ad
Editor Choice

सर्व तयारी पूर्ण ! राज्यभरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ ऑक्टोबर) : राज्यभरातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शाळांची घंटा आता खरोखरच वाजणार आहे. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर उद्यापासून (४ ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होत आहेत.

शाळा सुरू करण्याबाबत संस्थाचालकांसह शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी आग्रही मागणी सुरू केली होती. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे.

Google Ad

ऑनलाईन पद्धतीने सध्या शाळा सुरू असल्याचे तरी त्यात असंख्य अडचणी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू कराव्यात, या मागणीने जोर धरला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सध्या शाळा सुरू आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यास मान्यता न देण्याचे सूचविले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव नाकारला होता. मात्र, आता राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. तसेच, लसीकरणाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा सुरू होणार असले तरी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने मागविली आहे. ज्या शिक्षकांचे लसीकरण बाकी आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. शाळा सुरू करण्याबाबतची सर्व प्रकारची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहरी भागात इयत्ता ८वी ते १२वी तर ग्रामीण भागात ५वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!