Google Ad
Editor Choice

पिंपरी युवासेनासह सर्वपक्षीय उपोषणाने प्रशासनाला खडबडून जाग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ मार्च) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ह प्रभागाअंतर्गत नव्याने साफसफाईचे कंत्राट शुभम उद्योग या कंपनीला देण्यात आले परंतू कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता व असमाधानकारक कारणे देत कामावरून काढून टाकण्यात आले गोरगरीब कष्टकरी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली वारंवार विनवणी करूनही कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नाही.

त्याची दखल घेत पिंपरी युवासेना व सर्वपक्षीय सामाजिक संघटनेच्या वतीने जोपर्यंत या कामगारांना कामावर रूजू करण्यात येत नाही तोपर्यंत दापोडी येथे आमरण उपोषण करण्यात आले. आंदोलन तीव्र होण्यापूर्वी तात्काळ आंदोलनस्थळी आरोग्य अधिकारी आढाव साहेब यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांना कामावर पुन्हा रूजू करण्याचे आश्वासन दिले .

Google Ad

त्याप्रसंगी नगरसेवक राजू बनसोडे, मनोज वाखारे,शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, सामाजिक कार्यकर्ते शीला मामी जाधव,रुपेश पटेकर अध्यक्ष सचिव मनसे महापालिका कर्मचारी सेना पिंपरी चिंचवड शहर,सिमाताई बेलापुरकर शहर सचिव मनसे महिला सेना,ऍड सतीश कांबीये,मैत्री ग्रुप चे रवीभाऊ कांबळे,सिकंदर सूर्यवंशी,अजय कदम,गोपाळभाऊ मोरे,अस्मिता कांबळे, सुप्रिया काटे, जेनीबी सय्यद, अक्षय गायकवाड,संदेश बोराडे,प्रमोद गायकवाड, दीपक शिंदे, राहुल जाधव, अंकुशमामा जाधव, शिवसेना शाखाप्रमुख स्वप्नील शेवाळे, अमर अडसूळे,विशाल वाळुंजकर, उपस्थित होते. मागण्या पूर्ण झाल्यावर व उपोषण मागे घेतल्यावर पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश ह्यांनी सर्वांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!