महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३० जानेवारी २०२४ :- केंद्र शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम ‘’आयुष्मान भव’’ मोहिमेंतर्गत १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरूषांच्या आरोग्य तपासणीकामी महापालिकेच्या रुग्णालय तसेच दवाखान्यांमधील बाह्यरुग्ण विभागातील सर्व केसपेपर, औषधोपचार आणि तपासण्या मोफत करण्यासाठी आज प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह तळवडे येथील आ. क्र. १/५२ व १/५३ येथे बायोडायव्हर्सिटी पार्क आरक्षण विकसित करण्यासाठी तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडी (मुलींचे) येथे डिजीटल स्मार्ट रूम आणि आवश्यक अनुषंगिक बाबी यांचे कामकाज टर्न की प्रोजेक्टनुसार करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
निदेशक पदावर तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर नेमणूक करण्यासाठी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्र. १० मध्ये विद्यानगर, संभाजीनगर, शाहूनगरमध्ये डांबरीकरणाची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
वाकडमध्ये जलनि:सारण विषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच महापालिकेच्या प्रभाग क्र. २४ थेरगाव येथील आवश्यक त्या ठिकाणी स्टोर्म वॉटर लाईन टाकण्यासाठी आणि प्रभाग क्र. १५ मधील सार्वजनिक शौचालये यांची यांत्रिक पद्धतीने व मनुष्य बळाद्वारे दैनंदिन साफसफाई, देखभाल करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या रुग्णालयांच्या परिसरात जेनेरीक औषधी दुकान सुरू करण्यासाठी लागणारी जागा भाडेतत्वावर व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महापालिका प्रभाग क्र. १० मोरवाडी, मोरवाडी गावठाण व औद्योगिक परिसरात व इतर परिसरातील डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या प्रभाग क्र. १४ मधील मुख्य अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी तसेच मनपाचे प्रभाग क्र. १० संभाजीनगर व इतर परिसरामध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी आणि महापालिका परिसरातील मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध क्रिडा स्पर्धा २०२३-२४ आयोजित करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्स, वुमन्स टेनिस असोसिएशन स्पर्धेच्या आयोजनाकरीता अनुदान देण्यासाठी महापालिका सभेच्या प्राप्त अधिकारांतर्गत प्रशासक यांची मान्यता घेणेकामी शिफारस करण्यासाठी बैठकीत
प्रभाग क्र. ३ डुडुळगाव येथील मोशी- आळंदी रस्ता ते गट क्र. २१२ पर्यंतचा १८ मी रस्ता विकसित करण्यासाठी तसेच मोशी येथील गट क्र. ७५ ते १३७ पर्यंतचा ३० मी. डी. पी रस्ता विकसित करण्यासाठी आणि नॅकोफ इंडिया लिमीटेड या संस्थेस अमृत स्टोअर्सच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांच्या परिसरात जेनेरीक औषधी दुकान सुरू करण्यासाठी लागणारी जागा भाडेतत्वावर व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या खर्चास आज बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…