Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३१ मधून सर्व खान्देशवासी यांचा प्रा. उमेश बोरसे यांच्या नावाला पाठिंबा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ नोव्हेंबर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३१ मधून सर्व खान्देशवासी यांनी प्रा. उमेश बोरसे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे.. काल (दि.२३) झालेल्या खानदेशातील सर्व समाज मंडळाच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सांगवी, नवी सांगवी परिसरामध्ये गेल्या ३० वर्षापासून सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि खानदेश वाशी यांच्या वेळोवेळी मदतीला धावणाऱ्या प्रा. उमेश बोरसे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमताने पाठिंबा दर्शविला.

यावेळी येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अनेक ज्येष्ठ सदस्यांनी यावेळी दिली.. अनेक वर्षापासून आपल्याला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची खान्देशी माणसाला संधी मिळत नसल्यामुळे यावेळेस सर्व खानदेशी एकवटले असून सर्वांनी सर्वानुमते उमेश बोरसे सर यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा मानस दर्शवला आहे..

Google Ad

याप्रसंगी श्री अप्पा पाटील श्री शिवाजीराव माळी,श्री.युवराज पवार,श्री.सुरेश शिंदे,श्री.शारदसिंग परदेशी, श्री.अरुण अहिरराव,प्रा. किरण अमृतकर,श्री.सयाजी पाटील,श्री. कृष्णा पाटील,श्री.दत्तात्रय महाजन, श्री.अनिल बोरसे,श्री.भटू पाटील,श्री दिलीप पटेल श्री धनंजय भदाणे, श्री. संतोष महाजन,श्री.धनराज पाटील श्री श्री. राजेंद्र पाटील, श्री. बाविस्कर, श्री. हेमंत टोके, श्री. रवींद्र पाटील, श्री. जितेंद्र चौधरी,श्री.सदाशिव बोरसे,श्री.शांताराम पाटील श्री. यशवंत शिसोदे, श्री.श्री. सुनील अहिरराव, श्री. जगदीश पाटील, मंगेश पाटील, सचिन देवरे, जगन्नाथ पाटील, गोविंद पाटील, संदीप देशमुख, हेमंत पाटील, मनोहर पाटील, प्रशांत पाटील, अरुण साळुंखे सर, जगदीश पाटील, ध्यानेश्वर महाले,सतीश चव्हाण, डॉ . निलेश खैरनार, सचिन पवार,रोहित साळवी, अक्षय महाले, परेश पाटील, सुहास देशमुख, हर्षद सोनवणे, विजय चित्ते, स्वप्नील शेळके, मिलिंद पाटील, दिनेश चव्हाण, प्रफुल पाटील, महेंद्र साळुंखे आणि खानदेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!