महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ एप्रिल) : पिंपरी चिंचवड मधील नवी सांगवी-पिंपळे गुरव स्थित दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रात आज १२ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजेपासून अखंड नामजप यज्ञ याग सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
१८ एप्रिल २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक जवळ बॅडमिंटन हॉलच्या बाजूचे ग्राउंडवर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने दिनांक १२ एप्रिल ते १८ एप्रिल या काळात सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन व अखंड नाम, जप, यज्ञ,याग सोहळा साजरा केला जात आहे.
आज या सोहळ्याचा आज (१२एप्रिल) पहिला दिवस होता, यावेळी पारायणा साठी हजारो महिला व पुरुष सेवेकरी सामूहिक पद्धतीने वाचन केले. हे वाचन सकाळी ०८ ते १० वाजेपर्यंत सुरू होते. या सप्ताह काळात विविध याग तसेच ०७ दिवस अखंड श्री स्वामी समर्थ जप नामस्मरण, अखंड श्री स्वामी चरित्र सारमृत वाचन, विणा वादन सेवा असेल.
सलग ७ दिवस चालणाऱ्या या सप्ताहात शहरातील सुमारे १३०० बंधु भगिनी सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या अखंड नामजप यज्ञ याग सप्ताहात १२ एप्रिल रोजी मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, १३ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार श्री. गणेश याग, श्री. मनोबोध याग, १४ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार चंडीयाग १५ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार स्वामी याग, १६ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार श्री. गीताई याग, १७ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार रुद्र याग – मल्हारी याग, १८ एप्रिल रोजी बलीपुर्णाहुती सत्यदत्त पुजन अखंड हरिनाम जप यज्ञ तद्नंतर सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
गुरुचरित्र वाचन दर रोज सकाळी ०८ ते १० वेळेत असेल. नवी सांगवी येथील दिंडोरी श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राचे केंद्र प्रतिनिधी श्री पंकज जडे यांनी ही माहिती दिली. यावेळी शहरातील असंख्य बंधु भगिनी सेवेकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…