अजितदादांनी गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणून दाखवावेत: प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख
महाराष्ट्राभिमान युवक मेळाव्याच्या माध्यमातून युवक शहराध्यक्ष इम्रान शेख आणि विद्यार्थी प्रांताध्यक्ष सूनिल गव्हाणे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ ऑक्टोबर) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकअध्यक्ष इम्रान शेख, प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या नेतृत्वात नटसम्राट निळू फुले सभागृह येथे महाराष्ट्राभिमान युवक मेळाव्याचे आयोजन केले. तसेच भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव भागात हजारो युवकांची दुचाकी रॅली काढत शहरांमध्ये शरद पवार गटाने शक्तिप्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आवर्जून उपस्थिती लावली. मेळाव्याच्या निमित्ताने बोलत असताना मेहबूब शेख यांनी थेट अजित पवारांवरच शाब्दिक हल्ला चढवला. *”अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना वाघ होते, मात्र भारतीय जनता पक्षात गेल्यापासून दादांना निर्णय घेण्यात रोखले जातंय असं दिसतं. दादा खरच आपल्या कामात वाघ असतील तर पुणे जिल्ह्यातील वेदांता- फोक्सकोन, टाटा-एअरबस यांसारखे अनेक प्रकल्प नरेंद्र मोदींनी गुजरातला नेले हे प्रकल्प अजितदादांनी पुन्हा महाराष्ट्रात आणले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे.”* ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना घडवलं, मोठं केलं अगदी पीए असणाऱ्या लोकांना दिलीप वळसे पाटील गृहमंत्री केलं, ज्यांना मुंबईतून निवडून येता येत नाही अशा भुजबळांना नाशिक मधून निवडून आणून राज्याचे उपमुख्यमंत्री केलं, ज्यांना आपल्या मतदार संघात निवडून येता येत नाही त्या प्रफुल पटेलांना बारा-बारा वर्षे राज्यसभा दिली, केंद्रात मंत्री केलं. अशी लोक आज शरद पवार साहेबांना, ते हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवतात असे निवडणूक आयोगात सांगतात. अशा लोकांना खरंतर लाज वाटली पाहिजे अशी थेट टिका मेहबूब शेख यांनी केली.
*यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले “ज्यावेळी शहरात कोणीही भूमिका घ्यायला तयार नव्हतं तेव्हा या शहरात आंदोलन,मेळावे, पक्ष बैठका, या माध्यमतून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचे काम माझ्या युवक सहकाऱ्यांनी केलं.येणाऱ्या निवडणुकीमध्ये 50 टक्के तिकिट माझ्या युवक/युवतींना दिले गेले पाहिजे. येणाऱ्या काळात सर्वसामान्य घरातील २०/२५ नगरसेवक या महापालिकेत शहराचे नेतृत्व करताना दिसतील असा विश्वास इम्रान शेख यांनी दाखवला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे खरे शिल्पकार हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. पवार साहेबांनीच शहरांमध्ये एमआयडीसी आणली, शहराच्या बाजूला आयटी पार्क आणले. शरद पवार साहेब केंद्रात मंत्री असताना जेएनएनयुआरएम च्या माध्यमातून या शहराला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला. तोच निधी वापरून या शहराचा विकास झाला आहे.आज काही लोक सत्तेच्या राजकारणासाठी पक्ष सोडून गेली आणि ते विकासासाठी गेल्याच्या गप्पा मारत आहेत. मात्र सत्ताकेंद्री विकास आम्हाला मान्य नाही. जो विकास फक्त आमदारांच्या खोक्यांपुरता आहे तो विकास सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या विकासाच्या मागे जाण्यापेक्षा शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांसोबत राहणं आम्हाला जास्त गरजेचं वाटतं.
यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास टक्के उमेदवारी ही युवकांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि महानगरपालिकेत पवार साहेबांच्या विचारांची सत्ता येईल यासाठी सर्व तरुणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. तसेच युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या कामाचं देखील त्यांनी कौतुक केलं.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे,पिंपरी चिंचवड पक्ष निरीक्षक प्रकाश अप्पा म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख,महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर,युवक प्रदेश संघटक राहुल पवार युवक प्रदेशसचिव अमोल काळे,पुणे ग्रामीण अध्यक्ष स्वप्नील गायकवाड, माजी उपमहापौर विश्रांतीताई पडाळे,काशिनाथ नखाते, संदीप चव्हाण,माजी नगरसेवक गणेश भोंडवे, ओबीसीअध्यक्ष विशाल जाधव,अतुल चंद्रकांत राऊत (पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग)सोमनाथ धोंगडे (वरिष्ठ उपाधयक्ष मावळ तालुका रा्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल)मयूर गुरव (अधक्ष वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल) युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, राहुल आहेर, पंकज बगाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल शिरसागर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…