Categories: Uncategorized

अजित पवारांची फेसबुकवर पोस्ट … दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो, पण …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ नोव्हेंबर) : पवार कुटुंबातील सदस्य आपला दिवाळी सण दिवाळी पाडव्याला बारामती मध्ये मोठया आनंददायी वातावरणात साजरा करतात, परंतु यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेसबुकवर आपली कॉमेंट्स शेअर केली आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो.

दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो.

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…

57 mins ago

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…

23 hours ago

माॅक ड्रील- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…

7 days ago

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…

2 weeks ago