Google Ad
Uncategorized

भरसभेत आली चिठ्ठी; अन अजित दादा म्हणाले, मी काय …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : आज महाराष्ट्र दिन, बारमतीच्या प्रशासकीय भवनात महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांनी ध्वजारोहन केलं. त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मात्र यावेळी एक किस्सा घडला आहे. अजित पवार बोलत असताना अचानक त्यांना एक चिठ्ठी देण्यात आली. ज्या चिठ्ठीमध्ये मोकाट कुत्रे आणि जनावरांच बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात आली होती. या चिठ्ठीला अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.

Google Ad

विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत.अशातच, त्यांनी बारामतीत केलंलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. अजित पवार यांना सभा सुरु असताना एक चिठ्ठी आली. यामध्ये भटक्या कुत्र्यांसदर्भात तक्रार करण्यात आली होती. यावर अजित पवारांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.

बारामतीतील मोकाट कुत्री आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त करा, अशा आशयाची चिठ्ठी अजित पवारांना भरसभेत आली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आता काय करतो, शरद पवार साहेबांना सांगतो तुम्ही जनावरांकडे बघता का कुत्र्यांकडे बघता? साहेब म्हणाले, अजित जनावरांचे बघतो तर मी कुत्र्यांकडे बघतो आणि सुप्रियाला म्हणतो राहिलेलं तू बघ, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. अरे काय चेष्टा! मी याचा एका झटक्यात बंदोबस्त करीन. आता लाड बास झाले. बारामतीत कोंडवाडा तयार करू आणि त्या जनावरांच्या मालकांना पाच-दहा हजार दंड करू आणि कुत्र्यांची नसबंदी करू, असे अजित पवारांनी म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

दरम्यान, वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आपले काम असून पुणे-मुंबई हायवेवर 100 स्पीडच्या पुढे गाडी गेल्यानंतर दंड भरावाच लागतो. त्या पद्धतीने पुढेदेखील अशा पद्धतीची नियमावली सर्वत्र करण्यात विचाराधीन आहे. एक आमदार मला म्हणाला की माझा निम्मा पगार तर फक्त दंडावरच जातो. मात्र, आमदार असो व आमदाराचा बाप असो सर्वांना नियम सारखाच, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!