Google Ad
Editor Choice

अजित पवारांची मोठी घोषणा … लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावरील बंधने शिथिल … दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ऑक्टोबर) : गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण राज्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावर बंधने आलेली होती. मात्र, आता ही बंधने शिथील होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.
अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणी पुणेकरांकडून होत होती. त्यामुळे दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, असं पवार यांनी सांगितलं. गेल्या पंधरा दिवसात लसीकरणात 9 टक्के वाढ झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असेल तरीही त्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

Google Ad

राज्यात सिनेमा थिएटर्स, नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटर सुरू झाल्यानंतर होणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जर रुग्णसंख्या वाढली नाही तर शंभर टक्के क्षमतेने थिएटर सुरू करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच पुणे आणि पुणे शहरात आजपासून आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात उद्यापासून आठवडे बाजार सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

26 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!