Categories: Uncategorized

अजित पवारांच्या अनुपस्थित राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली; शिंदे सरकारचे 10 धडाकेबाज निर्णय, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ सप्टेंबर) : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.

उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठक :-

  • पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
  • अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
  • शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान
  • अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
  • औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
  • थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
  • धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
  • काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय
  • हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

इतर

  • लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत.
  • शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे
  • राज्यात 121 टक्के पेरण्या
  • राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरली
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे 1 कोटी 60 लाख भगिनींना 4787 कोटींचे वाटप
Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

6 days ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

1 week ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

1 week ago

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

2 weeks ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

3 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

4 weeks ago