Categories: Editor Choice

अजित पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा … म्हणाले, बारामतीत या अन…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७मे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचा उद्घाटन समारंभ पार पडला आहे. यावेळी पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे.

हे प्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अजित पवार यांनी अनेक जुन्या आठवनींना उजाळा दिला आहे.

ते म्हणाले, की मला वर बघून छान छान म्हणायला आवडत नाही. काही गोष्टी मला सांगायला पाहिजे. राजकरणात येण्यापूर्वी मी हे सर्व केले आहे. गाईची धार काढली आहे. आम्हाला याच्यातील बारकावे माहिती आहेत. मात्र आता खूप बदल झाला आहे. देशी गाईच्या गोमूत्राला, तुपाला तसेच खव्याला महत्त्व आले आहे.

अलीकडे पॅकिंगला खूप महत्त्व आहे. ते कसे चांगले होईल, यावर भर द्यायला हवा. दुधाचे भाव कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडत असते. यामध्ये सातत्य नाही. मात्र सरकारची भूमिका शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच मला पहिल्यापासून सकाळी लवकर कार्यक्रम घेण्याची सवय लागली. बारामतीत तर सहाची वेळ दिली, तरी लोक येतात. आम्हाला पवार साहेबांनी सवय लावली, ती आम्ही टिकवत आहोत, असे ते यावेळी म्हणाले. तर त्या त्या भागातील वातावरणाशी जुळवून घेतील, अशा गाई इकडे आणल्या गेल्यात.

वेगळ्या वेगळ्या भागात असे प्रदर्शन भरवू. मला मे शेवटपर्यंत सांगा आपल्याला काय लागणार ते, असे ते यावेळी म्हणाले. निधीची कमतरता असेल तर राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार, मात्र गरज असेल तेवढेच मागा, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले आहे.

त्यावेळी शेणापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तींसह अन्य वस्तू तयार केलेल्या स्टॉलला त्यांनी भेट दिली. त्यावेळी गणपतीची मूर्ती पाहून अरे असे नको, त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात असं म्हणत त्यांनी इतर वस्तूंची माहिती जाणून घेतली.दरम्यान, वरती लाल कार्पेट आणि खाली जमिनीची लेव्हल केली नाही. एखाद्या रानात चालतोय असेच वाटत आहे. गोरे गोमटे होण्यासाठी काहीतरी करायचे. बारामतीत या, कसे काम असते बघा, अशी अधिकाऱ्यांची शाळा अजित पवारांनी घेतली. गोठ्यांच्या पाहणीदरम्यान अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

8 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

15 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago