महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ एप्रिल) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमाला आज येणार होते. मात्र, आजारी असल्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले होते. चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अजित पवार येणार होते. मात्र त्यांचा हा नियोजित कार्यक्रम अचानक रद्द झाला.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी पुण्यातील कार्यक्रमाला हजर होते. आजारी असल्यामुळे ते पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमाला येऊ शकले नाही. दरम्यान, दुपारी सुस येथील कार्यक्रमाला ते हजर राहणार आहेत. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी देखील आजारपणामुळे ते पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमाला येऊ शकले नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अजित पवार हे शुक्रवारी (दि. 7) रात्री अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान त्यांनी शनिवारी खराडी (दि. 8) येथे खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली. पित्ताचा त्रास झाल्याने कालचे सर्व दौरे रद्द केले, असे स्पष्टीकरण त्यांनी पुण्यात दिले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…