Google Ad
Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या सौ.ऐश्वर्या जगताप- रेणुसे यांनी परिचारिकांच्या योगदानाचं स्मरण करून परिचारिकांना पुष्पगुच्छ देऊन जागतिक परिचारिका दिनाच्या दिल्या शुभेच्छा !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांच्या योगदानाचं स्मरण करून, त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी, १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.

आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची मुलगी सौ.ऐश्वर्या जगताप- रेणुसे यांच्या हस्ते बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथील रुग्णांची अहोरात्र आणि निस्वार्थी भावाने सेवा करणाऱ्या परिचारिकांना पुष्पगुच्छ देऊन जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Google Ad

यावेळी सौ.ऐश्वर्या जगताप- रेणुसे
म्हणाल्या सातत्याने परिचारिका रुग्ण सेवेत आपले अनमोल कार्य करीत असतात . रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचं , त्यांना आनंद देण्याचं महत्त्वाचं कार्य त्या करत असतात. वैद्यकीय क्षेत्रातलं परिचारिकांचं योगदान अमूल्य आहे. त्यांची समर्पण वृत्ती आणि कामाबद्दलची तळमळ उल्लेखनीय आहे, अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत असाधारण कार्य करणाऱ्या परिचारिकांचं, कौतुक यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!