Ahmadnagar : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे ‘ या ‘ शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाचा फायदा आदिवासी शेतकरी घेत आहेत. विकेल ते पिकेल या धोरणानुसार या भागातील शेतकरी जांभळा भात पिकवित आहेत. स्वतः आदिवासी शेतकरी विविध प्रदर्शनात तांदूळ विकत आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे आदीवासी शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी केले आहे.

वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील शिरपुंजे, धामणवन या भागातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतीशाळामध्ये ‘भात नर्सरी लागवड ते काढणी पश्चात विक्री व्यवस्था’ याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

पुढे वैभव पिचड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातील शेती व्यवसायाला स्वातंत्र्य, स्थैर्य आणि उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. तसेच जांभळा भात पिकविल्याने या भागातील शेतकरी शेठ झाले आहेत. जांभळ्या भातातील औषधी गुणधर्माचा उपयोग आजारी माणसांना होईल, या भातामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे, त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी व आपला शेतीमाल स्वतः विकून फायदा मिळवावा, असे आवाहन पिचड यांनी केले.

दरम्यान, आदिवासी भागात पिकविलेला हा भात महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, तालुका कृषीअधिकारी प्रवीण गोसावी, प्रगतशील शेतकरी गंगाराम धिंदळे, शेतीतज्ज्ञ रमाकांत डेरे तसेच शेतकरी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

21 mins ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago