Google Ad
Uncategorized

सांगवीतील अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट येथे मुसळधार पावसामुळे सुरक्षा भिंतींवरील पत्रे निखळून धोकादायक परिस्थिती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ एप्रिल) : माहेश्वरी चौक येथील महापालिकेच्या अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट येथे गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे सुरक्षा भिंतींवरील लोखंडी बार, पत्रे निखळून पडले आहेत. सुरक्षा भिंतींवर लावण्यात आलेले लोखंडी बार व पत्रे येथे येणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. ये-जा करताना एखाद्याच्या अंगावर पडून अपघात घडून येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकात पवना नदी किनारी महापालिकेचे अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट परिसर आहे. याला लागूनच महापालिकेचे कचरा निर्मूलन संकलन केंद्र आहे. या दोघांच्या मध्ये सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. या सुरक्षा भिंतींवर लोखंडी बार उभारून पत्रे लावण्यात आले आहे. ज्या लोखंडी बारवर पत्रे लावलेले आहेत, ते पूर्णपणे गंजून गेले असून त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे, आणि त्यामुळेच हे पत्रे तुटून पडले आहेत, मात्र गुरुवारी रात्री अचानक सुसाट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सुरक्षा भिंतींवर लावण्यात आलेले लोखंडी बार व पत्रे निखळून धोकादायक अवस्था निर्माण झाली आहे. एखादी दुर्घटना घडून अनर्थ होऊ शकतो. महानगरपालिका ठेकेदाराकडून काम करून घेत असताना संबंधित अधिकाऱ्याने कामाच्या दर्जाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु तसे होताना कुठेच दिसत नसलयाने ही परिस्थिती ओढवत आहे , हे मात्र नक्की…

Google Ad

जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील नागरिक येथील घाटावर दशक्रिया विधी करण्यासाठी मोठया संख्येने येत असतात. यावेळी आप्तेष्ट, नातेवाईक, आदी परिसरातून येणारे मित्र परिवार, महिला येत असतात. यावेळी ये-जा करताना येथील धोकादायक लोखंडी बार व पत्रे एखाद्याच्या अंगावर पडून अपघात घडून येऊ शकतो. याकडे संबंधित महापालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष न करता निखळून पडलेले लोखंडी बार व पत्रे काढून टाकण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!