Google Ad
Uncategorized

शाळेची घंटा वाजली अन, पुन्हा २० वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा … सांगवीच्या बाबुरावजी घोलप विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा जोरदार संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि,.०२ एप्रिल) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २००२-०३ मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थ्यांनी २० वर्षानंतर पुन्हा एकत्र येत रविवार, दि. ०२ एप्रिल, २०२३ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. सदर स्नेहमेळावा २०० हुन अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसादात आणि ५० हुन अधिक शिक्षकवृंदाच्या उपस्थितीत जोरदार संपन्न झाला. नेहमीप्रमाणे शाळेची घंटा वाजली आणि पुन्हा २० वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली.

शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर सन २००२-२००३ मध्ये दहावीत शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत शाळा भरविली. श्रीमती मिसाळ मॅडम, श्रीमती शेजवळ मॅडम, श्री. घाडगे मॅडम, श्री. सिध्दा सर यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वर्गात अध्यापनाचे वर्ग घेतले.

Google Ad

यावेळी २००२ साली जशी शाळा भरत होती. अगदी तसेच निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, तसेच मुलींनी देखील शाळेचा ड्रेस परिधान करून माजी विद्यार्थी शाळेत उपस्थित झाले होते. त्याकाळी जसे शाळेच्या बाहेर पेरू, चिंच, आवळा, बॉबी, कुल्फीची गाडी आणि बरेच काही विक्रेते उपस्थित करून जुने शालेय जीवनाचे हुबेहूब प्रत्यक्षात चित्र उभे केले होते. त्यामुळे आपल्या बालपणीची शाळा विद्यार्थी, शिक्षक या विद्यार्थ्यांना अनुभवायला पहायला मिळाली.


सर्व माजी विद्यार्थी – शिक्षक २० वर्षानंतर एकत्र भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव मा. श्री. एल.एम. पवार सर, बाबूरावजी घोलप विद्यालयाचे प्राचार्य श्री. मापारी सर, उप-प्राचार्य श्री. निमसे सर, पर्यवेक्षिका श्रीमती पोळ मॅडम व शिक्षकवृंद उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी श्री. जगताप सर यांनी आपले मनोगत मांडले. श्रीमती मिसाळ मॅडम यांनी कार्यक्रमाच्या तयारीपासून ते कार्यक्रमापर्यंतचे सर्व वर्णन सुरेख कवितेद्वारे सादर केले. माजी विद्यार्थ्याच्या हस्ते सर्व पदाधिकारी व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यानंतर शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी संगीत खुर्ची खेळाचे, तसेच गाणी, कविता यांचा कार्यक्रम घेतला. या मध्ये शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सदर स्नेहमेळाव्याचे नियोजन विद्यालयाचे माजी विद्यार्थी अविनाश खुंटे, निरज सांळूके, दिपक घोळे, सुशांत पवार, सचिन काळे, अमित दातीर, अमित आवारे, सचिन गव्हाणे, मृणालिनी गणगे, स्वाती कांबळे, मालिनी धेंडे, कीर्ती पाटील, प्रमिला पवार, प्रीती काकडे, देवयानी सरोदे, यांनी पुढाकार घेऊन आयोजन केले होते.
********

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!