महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जुलै) : भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे मावळते शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन शहराध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच केली आहे. भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आज ‘शंकर जगताप’ यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र स्वीकारले.
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि राज्याचे नेते उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, मा.चंद्रशेखर बावनकुळे व पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली संघटन मजबूत करण्याबाबत प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला व माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल आभार व्यक्त केले.
तसेच, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे वनमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार, आरोग्य मंत्री मा. प्रा.तानाजीराव सावंत, भाजपाचे राज्य उपाध्यक्ष मा.सुनिल कर्जतकर यांची भेट घेतली आणि नवीन जबाबदारीबाबत मार्गदर्शन कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी शंकर जगताप यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालयास भेट दिली.
त्याप्रसंगी भोसरी विधानसभा आमदार श्री. महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेच्या आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, विधानपरिषद आमदार सौ. उमाताई खापरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. विलास मडिगेरी, माजी सत्तारुढ पक्षनेते श्री. नामदेव ढाके, माजी नगरसेवक श्री. अभिषेक बारणे, शहर उपाध्यक्ष श्री. शेखर चिंचवडे, सांगवी काळेवाडी मंडलाध्यक्ष श्री. विनोद तापकीर, चिंचवड किवळे मंडलाध्यक्ष श्री. योगेश चिंचवडे, उद्योजक श्री. नवीन लायगुडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…