Categories: Uncategorized

दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर पिंपरी चिंचवड हद्दीत रात्री दहाच्या सुमारास लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप आणि शंकरभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने मनोज जरांगे पाटील आणि मराठा मावळ्यांच्या पदयात्रेचे जंगी स्वागत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जानेवारी) : मराठयांचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाच्या दिवसभराच्या प्रतिक्षेनंतर रात्री दहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड हद्दीत मराठा पदयात्रा पोचली.या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे फुलांची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले . यावेळी सांगवी फाटा येथे प्रचंड मोठा जनसमुदाय पाहून त्यांनी ४५ मिनिटे भाषण केले, येथील भाषणात जरांगे पाटील म्हणाले.

आमचा लढा सुरूच राहणार आहे सत्तर वर्ष मराठा समाजाला मूर्ख बनविण्याचे काम सरकारने केले. आम्ही षडयंत्रला घाबरत नाहीत. आमच्या मराठा लेकरांसाठी हा लढा शेवटपर्यंत घेवुन जावू. ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायचीच कोणीही आडवा आला तरी त्याला आडवा करू, आत्ता जगायचे ते फक्त मराठ्यांच्या लेकरांसाठीच्या न्याय हक्कासाठीच.

मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरातून जात असताना पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सांगवी फाटा येथून संपूर्ण रस्त्यावर पदयात्रेतील मराठा समाज बांधवांसाठी ठिकठिकाणी सेवा व्यवस्था करण्यात आली.

बुधवार ता.२४ सकाळी ९ वाजल्या पासून जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, दापोडी, नवी सांगवी परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पदयात्रेच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. रात्री दहाच्या सुमारास औंध राजीव गांधी पुलावरून पदयात्रेचे पिंपरी चिंचवड शहर हद्दीत आगमन झाले. त्यावेळी लोकनेते ‘लक्ष्मण जगताप’ व ‘शंकरभाऊ जगताप’ मित्रपरिवाराच्या वतीने जे सी बी मधून फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले, सकल मराठा समाज परिवार दिवसभर स्वागताची वाट पहात होता, सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सांगवी फाटा, रक्षक चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा चौकांमधून स्वागत कमानी, कॉर्नर स्टेज उभारण्यात आले होते.

सांगवी फाटा ते रक्षक चौक जगताप डेअरी मार्गावर अल्पोहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खिचडी, केळी वाटपासाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. चलो मुंबई , एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिस विभागाकडून रहदारीसाठी चोख व्यवस्था व बंदोबस्त ठेवण्यात आला.

ढोलवाद्यांच्या गजरात स्वागत करण्यासाठी परिसरातील विविध ढोलताशा पथकांना पाचारण करण्यात आले होते. पदयात्रेतील पाच हजार बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था सांगवी फाटा दरम्यान मार्गावर पाचशे डझन केळी,नाष्टा,पाणी बाटली, बाॅक्स , साधारण एक हजार भगव्याटोप्या, ताफ्यातील बैलगाडीच्या बैलांसाठीही खुराक इ. व्यवस्था मार्गावर करण्यात आली होती.

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

2 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago