Google Ad
Maharashtra crimes

मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन … तरुणावर केला तिघांनी कोयता व चाकूने वार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जून) : मित्राने एकाची गर्लफ्रेंड पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी कोयता व चाकूने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी नदीम अहमद सय्यद (वय २७, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २१०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इरफान इम्तीयाज खान (वय २५), मोसीम सलीम शेख (वय २४, रा. मनीष पार्क, कौसरबाग, कोंढवा व आणखी एकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक दरम्यान शनिवारी पहाटे साडेतीन वाजता घडला.

Google Ad

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र साहील गुलाम शेख हे मोटारसायकलवरुन पहाटे चहा पिण्यास जात होते. त्यावेळी आरोपी यांचा पाठलाग करत आले. त्यांनी लुल्लानगर चौकात त्यांना गाठले. साहील शेख याने इरफान खानची गर्लफ्रेंडला पटविले होते. त्याचा राग त्यांच्या मनात होता. या कारणावरुन त्यांनी साहील याच्यावर कोयता व चाकूने खांद्यावर, बरगडीवर व डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. साहील याच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी मोसीम शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!