Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महापालिका सभा  आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या  विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी दिली मंजुरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १ नोव्हेंबर  २०२२:- महापालिका सभा  आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या  विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक  शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली.  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील,  जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.  

          नवीन लेखाशीर्ष तयार करणे, विकासकामाचे स्थळबदल करणे, विकासकामाच्या नावात बदल करणे आदी विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

ब प्रभागामध्ये मातीचे ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार असून अनुषंगिक विद्युत व स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. याकामी १ कोटी २१ लाख खर्च होणार आहे.  देहू आळंदी रस्त्याच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रोहित्रसंच व खांब हलविण्यात येणार आहे. याकामी १ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सन २०२२- २३ करीता पिंपळे गुरव टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्र, एल्प्रो पाण्याची टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्र तसेच दत्तनगर जलक्षेत्रातील वितरण व्यवस्थेचे परिचालन करण्यासाठी मजूर पुरविण्याकामी १ कोटी २० लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र.३ येथील विविध ठिकाणी महापालिकेच्या इमारतींची आणि शाळांची सुधारणा करण्यात येणार आहे.

याकामी ४८ लाख रुपये खर्च होतील. प्रभाग क्र. ७ मधील भोसरी येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी येणाऱ्या ४९ लाख रुपये खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

22 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago