Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या सुमारे ५१ कोटी रुपये खर्चाच्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी दिली मंजुरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ९ नोव्हेंबर २०२२:-  स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे  ५१ कोटी रुपये खर्चाच्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक  शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली.  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील,  जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

         मांजरांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची कार्यवाही तसेच उपाययोजना करण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले असून स्थायी समितीने त्यास मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा विषय महापालिका सभेपुढे मांडण्यात येणार आहे. प्रभाग क्र. ४ मधील दिघी – बोपखेल येथील महापालिका शाळेची सुधारणा व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी १८ लाख रुपये खर्च होणार आहेत. सन २०२२-२३ करिता थेरगाव टाकी व त्यावरील बायपास जलक्षेत्रातील वितरण व्यवस्थेचे परिचलन करणेसाठी मजूर पुरविण्याकामी ४३ लाख रुपये खर्च होणार आहेत.

Google Ad

चिंचवड केशव नगर सर्व्हे क्र. २९२ येथील मैलापाणी पंपिंग स्टेशन लगतच्या मोकळ्या जागेत नवीन आवश्यक त्या क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. याकामी ९ कोटी ३६ लाख रुपये खर्च होईल. कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत कै. अकुंशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील  शेजारील जागेत ५ एमएलडी  क्षमतेचे एसटीपी बांधण्यात येणार आहे. याकामी १० कोटी ५७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

चिंचवड वाल्हेकरवाडी सर्व्हे क्र. ९४ येथील जुन्या नादुरुस्त मैलापाणी पंपिंग स्टेशनच्या जागेवर नवीन आवश्यक त्या क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी ९ कोटी ८० लाख रुपये खर्च होणार आहेत.  प्रभाग क्र. ९ मधील खराळवाडी येथील बालभवन शाळा इमारत व इतर इमारतींची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ३१ लाख रुपये खर्च होतील. सन २०२२-२३ करिता प्रभाग क्र. १७ मधील महापालिका इमारतींची स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीकामी १८ लाख रुपये खर्च होणार आहेत.

          केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवाज योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेमार्फत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी बो-हाडेवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या निवासी गाळ्यांच्या ठिकाणी  विद्युत विषयक इन्फ्रास्ट्रक्चर कामे करण्यासाठी ६ कोटी ५३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील बी.आर.टी. लेनमध्ये आवश्यकतेनुसार प्रकाश व्यवस्था करणे आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या १९ लाख रुपये खर्च होणार आहेत.

प्रभाग क्र. ९ मधील मासुळकर कॉलनी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या नेत्र रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटरकरीता विद्युत व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी २ कोटी ८८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ड प्रभागामध्ये मातीचे ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी १ कोटी ३९ लाख रुपये, निगडी येथील संगीत अकादमीच्या स्थापत्य विषयक कामांसाठी २ कोटी ५७ लाख रुपये, नेहरूनगर येथील पॉलीग्रास मैदान अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये खर्च येणार आहे.  या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!