Google Ad
Editor Choice Pune District

मुळशी तालुक्यात सोशल डिस्टन्स नियमांचे पालन … अगदी साध्या पध्दतीने गौरी, गणपतीचे विसर्जन!

महाराष्ट्र 14 न्यूज : मुळशी तालुक्यातील पौड या गावातील मुळा मुठा नदीच्या काठावर गौरी गणपती विसर्जन करण्यात आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करून मोठ्या आंनदाने, पण अगदी साद्या पद्धतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी महिलावर्गाची उपस्थिती चांगली होती. गौरी गणपती विसर्जनच्या वेळी कुठलाही अनधिकृत प्रकार घडू नये, म्हणून यासाठी पौड पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, उपनिरीक्षिका रेखा दहीभाते, हवालदार संदीप सपकाळ व इतर कर्मचारीवर्ग बंदोबस्तासाठी उपस्थित होता.

आजूबाजचे गणपती मंडळे आणि घरघुती गणपती यावेळी विसर्जनासाठी नदीकाठी येत होते. नियमांचे पालन करा असे आवाहन पोलीस निरीक्षक धुमाळ गणेश भक्तांना करत होते. मुळशी तालुक्यातील पौड गावचा गणपती विसर्जनाचा नेहमीचा धूमधडाका यावर्षी खुप शांत होता. शासनाचा आदेशाचे पालन करून गौरी, गणपती विसर्जन मिरवणूक न काढता अगदी साध्या पद्धतीने विसर्जन सोहळा संपन्न झाला. जनतेने ही बंदोबस्तासाठी उपस्थित असणाऱ्या पोलीस प्रशासनास सहकार्य करून प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Google Ad

प्रतिनिधी : अनुराग माने, मुळशी

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,838 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!