Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्वतः घेतला कामांचा आढावा!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २५ जुलै २०२२ : “घरोघरी तिरंगा” या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आज पार पडलेल्या जनसंवाद सभेच्या माध्यमातून करण्यात आले.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या निर्देशानुसार दि.१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रामध्ये देखील “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे यासाठी जनसंवाद सभेच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे.

महापालिकेच्या वतीने आज आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या जनसंवाद सभेत सुमारे ८९ नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे ८, १०, ६, ८, ५, १०, २२ आणि १० नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी उपस्थित होते.‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नियंत्रित अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यात त्यांनी काही निरस्थ तक्रारी तरतूद आणि निधी नसल्याने तसे कळवून निकाली काढाव्यात अशी सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारवजा सूचना मांडल्या. त्यामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी, पाणीपुरवठा स्वच्छ आणि योग्य दाबाने करावा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक जनजागृती करण्यात यावी,अनधिकृत बांधकामांवर तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अनधिकृत पत्राशेड हटवावे, रस्त्यावरील गतिरोधक नजरेस पडावेत यासाठी त्यावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होत आहे तो पूर्ववत करावा, ड्रेनेज लाईनची कामे करावी, अनधिकृतपणे ड्रेनेज वाहिन्यांना जोडणी केलेल्या मिळकत धारकांवर कारवाई करावी, नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने पदपथ आणि दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवावी, रस्ता रुंदीकरण करावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, सुलभ शौचालयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करावा, रोडवरील पार्किंग ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात आलेली वाहने हटवावीत, वृक्षारोपण करण्यास जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना नागरिकांच्या वतीने जनसंवाद सभेत करण्यात आल्या.

पिंपरी येथील क्रोमा बिल्डिंग जवळ नेपाळी मार्केट जवळील टपऱ्या काढण्या बाबत अनेक दिवस पाठपुरावा करूनही कारवाई होत नाही. यात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा माझा आरोप आहे. तसेच या भागात डुकरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने दलदल होऊन अनेकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

रफिक कुरेशी

आज घडलेली घटना , Atlas कॉलनी संत तुकाराम नगर येथे काही अज्ञात लोक स्विफ्ट डिझायर या गाडीतून  येऊन मोकाट फिरणाऱ्या जनावरांना इंजेक्शन देऊन गाडीत घालून घेऊन जात आहेत. मनपाने पाहणी करून, त्यांच्यावर कारवाई करावी.
सुजाता पलांडे, माजी नगरसेविका

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

5 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

22 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago