Categories: Editor Choice

आपल्या कर्तुत्वाने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकामध्ये भर घालणा-या … माधुरी गरुड, ऋतुराज गायकवाड, ह.भ.प. सतीश महाराज काळजे, प्रसाद पाटील यांचा महापालिका सभेमध्ये सत्कार!

 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० ऑक्टोबर २०२१) : आपल्या कर्तुत्वाने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकामध्ये भर घालणा-या माधुरी गरुड, ऋतुराज गायकवाड, ह.भ.प. सतीश महाराज काळजे, प्रसाद पाटील यांचा सत्कार महापालिका सभेमध्ये महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह व पुस्तक भेट देऊन करण्यात आला.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य नवनाथ जगताप, नगरसदस्या सिमा चौगुले, माधवी राजापुरे, विजूआण्णा जगताप, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

माधुरी गरुड यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेमध्ये ५६१ रॅ॑क मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील उत्तीर्ण झालेल्या एकमेव व्यक्ती म्हणून सत्कार करण्यात आला.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या शहरातील नागरिक व उदोयन्मुख खेळाडू ऋतुराज गायकवाड याचा सत्कार त्याच्या आई व वडिलांनी स्विकारला. अध्यात्मिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल , ह.भ.प. सतीश महाराज काळजे यांचा सत्कार करण्यात आला.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

7 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago