नवी सांगवीत स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-या दलालांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) :पिंपरी येथील स्पा च्या नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलीना स्पा च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी न अमलदार यांना प्राप्त झाली.
त्यानंतर अशा दलाल व्यक्तींची गोपनीय माहिती काढून अनैतिक मानव वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व उमलदार यांनी दिनांक १८/०५/२०२३ रोजी सापळा रचून बनावट ग्राहका करवी वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता, दलालाने सांगवी परिसरातील JASMINE FAMILY SPA सर्वे नं. ७१/१/२/६० मेन रोड, कृष्णानगर, नवी सांगवी, पुणे येथे अचानक छापा टाकला .
यावेळी आरोपी कुणाल राममूर्ती रेड्डी, बच ३९ वर्ष, रा. १९ / ३ नाईक चाळ, विटभट्टी जवळ बोपोडी, पुणे व दुसरी महिला आरोपी यांच्या ताब्यातून दोन मुलींची देश्याव्यवसायातून सुटका केलेली आहे. आरोपी कुणाल राममूर्ती रेड्डी यास ताब्यात बेवून सांगवी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२९ / २०२३ भादवि कलम ३७० (३) ३४ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…