Google Ad
Uncategorized

नवी सांगवीत वेश्याव्यवसाय करवुन घेणा-या दलालांवरती कारवाई … ०२ पिडीत महिलांची सुटका, तर आरोपीला अटक

नवी सांगवीत स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-या दलालांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) :पिंपरी येथील स्पा च्या नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलीना स्पा च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी न अमलदार यांना प्राप्त झाली.

Google Ad

त्यानंतर अशा दलाल व्यक्तींची गोपनीय माहिती काढून अनैतिक मानव वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व उमलदार यांनी दिनांक १८/०५/२०२३ रोजी सापळा रचून बनावट ग्राहका करवी वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता, दलालाने सांगवी परिसरातील JASMINE FAMILY SPA सर्वे नं. ७१/१/२/६० मेन रोड, कृष्णानगर, नवी सांगवी, पुणे येथे अचानक छापा टाकला .

यावेळी आरोपी  कुणाल राममूर्ती रेड्डी, बच ३९ वर्ष, रा. १९ / ३ नाईक चाळ, विटभट्टी जवळ बोपोडी, पुणे व दुसरी महिला आरोपी यांच्या ताब्यातून दोन मुलींची देश्याव्यवसायातून सुटका केलेली आहे. आरोपी कुणाल राममूर्ती रेड्डी यास ताब्यात बेवून सांगवी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२९ / २०२३ भादवि कलम ३७० (३) ३४ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!