महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मार्च) :पुण्यात गोवा राज्य निर्माण व गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मद्याची अवैधरीत्या तस्करी करण्यात आली. यात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. एकूण ८६,००,१६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर गोवा राज्य निर्माण व फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मद्याची अवैधरीत्या तस्करी करण्यात येत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्काकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. अश्यातच आता राज्य उत्पादन शुल्काकडून औषध वाहतूक करण्याच्या नावाखाली गोवा राज्य निर्माण व फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मद्याची अवैधरीत्या तस्करी करून वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्काकडून धडक कारवाई करण्यात आली. यात एकूण ८६,००,१६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत एकाला अटक : या कारवाईमध्ये शंकरलाल जोशी वय ४६ वर्षे याला अटक केली आहे. व्यवसाय-ट्रक चालक राहणार जैन मोहल्ला, तालूका सलुंबर, जिव्हा उदयपूर राजस्थान याला जागीच अटक केली आहे. या गुन्हयामध्ये ओमपूरी नावाचा इसम फरार झाला आहे. अटक आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (अ) (ई) ८१.८३,९०, १०२, १०८ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई : राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क तळेगाव, दाभाडे विभाग या कार्यालयाच्या पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. कारवाईत पथकाने वाहतूक करणारा भारत बेंझ कंपनीचा एक कंटेनर ट्रक जप्त केला. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील विविध ब्रँडचे विदेशी मद्याच्या व बिअरच्या बाटल्या मिळून आल्या. एकूण ८४५ बॉक्स असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईमध्ये वाहनासह एकूण रुपये ८६,००,१६०/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…