Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या पिंपळे गुरव येथील स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथावर अतिक्रमण झालेल्या भागावर अतिक्रमण पथकाची कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे गुरव परिसरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विकासाची कामे करीत असताना स्मार्ट सिटीला अडचणी येत आहेत. यामध्ये व्यावसायिक, छोटे मोठे दुकानदार, रहिवासी यांना देखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी सकाळी महापालिकेच्या ह क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण विभागाकडून अडथळा निर्माण होत असलेले दुकानांसमोरील ओटे, पायऱ्या यांवर धडक कारवाई करण्यात आली.

पिंपळे गुरव येथील कृष्णा चौकाकडून काटेपुरम चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत पदपथ तसेच सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. मात्र या कामकाजासाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यवसायिकांचे, दुकानदारांचे, रहिवाश्यांचे पायऱ्या, ओटे, इमारतींचे प्रवेशद्वार अडथळा निर्माण करीत होते. यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली.

Google Ad

येथील कृष्णा चौक ते काटेपुरम चौक १८ मीटर रुंद रस्ता विकास मंजूर आराखड्यातला आहे. या रस्त्याला दोन्ही बाजूने पदपथ आणि एका बाजूने सायकल ट्रॅक करण्याचे विकास कामात ठरविण्यात आले आहे. १८ मीटर रुंदीच्या रस्त्यात बाधित होत असलेले दुकानांसमोरील पायऱ्या, ओटे, इमारतींचे प्रवेशद्वार अडथळा ठरत असलेले यांवर बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून साडे तीन वाजेपर्यंत धडक कारवाई करण्यात आली.

यावेळी पत्रा शेड असलेले व्यावसायिकाचे दुकान तसेच रहिवासी असलेल्या एका इमारतीवर कारवाई करण्यात आली नाही. या ठिकाणी रहिवासी राहत असल्याने महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागामार्फत रीतसर नोटीस देऊन नियोजित कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

पिंपळे गुरव येथील कृष्णा चौक ते काटेपुरम चौक येथील रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत असताना दुकानदार, व्यवसायिक, रहिवासी तसेच महापालिका अधिकारी, स्मार्ट सिटी अधिकारी यांच्यात वादविवाद होताना दिसून आला. रस्त्यावर रस्त्याच्या कडेला यावेळी नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून आली. रस्त्यावरील वाहतूक अनेकदा ठप्प होताना दिसून आली.

याप्रसंगी ह प्रभाग क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, स्मार्ट सिटी महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, स्मार्ट सिटी उपअभियंता चंद्रकांत मोरे, पाणीपुरवठा विभाग राहुल पाटील, नामदेव लांडगे, प्रकल्प व्यवस्थापक विजय बांदल, शिवाजी पाडुळे, उप अभियंता अरविंद माळी, सर्व्हेअर मुकुंद क्षीरसागर, ह क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी दत्तात्रय लांडगे, बाळू शितोळे, धोंडिबा शेळके, भिमाजी देवकर, सचिन जोशी, विक्रम ठाकूर, नंदकुमार फणसे, निशिकांत गोसावी, अतिक्रमण महापालिका सहाय्यक फौजदार आर. व्ही. देवगिरीकर, एनथोनी गोकावी, पोलीस नाईक खुशाल वाळूनजकर यावेळी उपस्थित होते.

क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत यापुढे येणाऱ्या अडचणींबाबत संयुक्त विद्यमाने विचार विनिमय करून यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल.
विजय थोरात, ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी

 

पिंपळे गुरव मध्ये जेवढे विकास आराखड्याचे रस्ते आहेत ते रस्ते रुंदीकरण करणे आणि त्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, पदपथाची व्यवस्था करणे, जास्त रुंदीचे रस्ते असतील तर तेथे सायकल ट्रॅक करणे हे काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू आहे. त्या अंतर्गत कृष्णा चौकापासून काटेपुरम कडे जाणारा रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला पदपथाची व्यवस्था केली आहे. पदपथासाठी लागणारा आवश्यक रुंदीचा पदपथ तयार करण्यास अडथळे येत होते. कृष्णा चौक ते काटेपुरम चौक १८ मीटर रुंद ज्या बाजूला अतिक्रमण होते विशेष करून दुकानांपुढे आलेले ओटे, पायऱ्या, इमारतीचे प्रवेशद्वार अतिक्रमण केल्याने ते हटविणे आवश्यक होते. यासाठी आज अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
मनोज सेठिया, स्मार्ट सिटी कार्यकारी अभियंता

रस्त्याच्या समोरील बाजूस नुसता पदपथ, आणि आमच्या बाजूला पदपथ, सायकल ट्रॅक करण्यात येत आहे. केला तर दोन्ही बाजूला करावा सायकल ट्रॅक. आमच्यावरच अन्याय का? विकास कामांना आमचा विरोध नाही. सर्वांनाच समान न्याय मिळावा. समोरील बाजूला अतिक्रमण नाही आणि आमच्याच बाजूला विकासासाठी अतिक्रमण हा कुठला न्याय, हा अन्याय होत आहे.
गोरख देवकुळे, व्यावसायिक

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!