Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

कुठे झाली, शाळा व महाविदयालय आवारात विनाकारण फिरणा – या रोड रोमिओंवर कारवाई … १,३८,५०० / – रुपयांचा दंडही वसुल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ जुलै) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडुन रोड रोमिओवर कारवाई शाळा व महाविदयालय आवारात विनाकारण फिरणा – या रोड रोमिओंवर कारवाई करुन १,३८,५०० / – रुपयांचा दंड वसुल : मा . श्री . अंकुश शिंदे , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना आपल्या पोलीस स्टेशनचे हद्दीमधील सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविदयालय आवारामध्ये परिणामकारक पेट्रोलिंग करुन रोडरोमिओवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हददीतील अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविदयालयाचे संपुर्ण आवारात दिनांक २२/०७/२०२२ रोजी पेट्रोलिंग करुन विनाकारण फिरणा – या रोड रोमीओवर कारवाई करण्यात आलेली आहे .

त्यामध्ये एकुण ६७ शाळा व महाविदयालय आवारामध्ये पेट्रोलिंग करुन एकुण २५ रोड रोमिओंविरुदध महाराष्ट्र पोलीस अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे तसेच भारतीय दंड संहीता अन्वये एकुण ०२ रोड रोमिओंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . तसेच शाळा व महाविदयालय परिसरात विनाकारण फिरणा – या एकुण १५३ इसमांवर मोटार वाहन कायदयाअन्वये कारवाई करुन त्यांचेकडुन एकुण १,३८,५०० / – रुपयांचा दंड वसुल करण्यात आलेला आहे .

Google Ad

तरी भविष्यात सदर कारवाया सुरु ठेवण्यात येणार असुन गैरकृत्य करणा – या रोड रोमिओवर कडक कारवाई करण्यात येणार आहे . तसेच पिंपरी चिंचवड हददीतील नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की , आपल्या परिसरातील शाळा व महाविदयालय ठिकाणी महिला व विदयार्थीनींशी छेडछाडीचा अनुचित प्रकार आढळुन आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष येथे मोबाईल कमांक ९५२९६९१९ ६६ किंवा पिंपरी चिंचवड हेल्पलाईन नंबर ११२ या क्रमांकावर किंवा जवळील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!