Google Ad
Editor Choice

अपशब्द वापरल्याने झालेल्या भांडणामध्ये चाकु भोकसुन खुन … आरोपीस ०२ तासामध्ये अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७एप्रिल) : पुणे जिल्ह्यातील मौजे – खराबवाडी , ता – खेड जि – पुणे येथील पवार वस्ती येथे राहणारा व व्यंकटेश ऑटो पार्टस कंपनीमध्ये काम करणारा अर्जुन रामलखन यादव याचे लग्न जमल्याने त्याचे घरी जेवणसाठी धर्मेंद्रसिंग हरिसिंग सिसोदीया हा गेला असता तेथे त्याचे तोंडुन भोसडीके असा अपशब्द निघल्याने अर्जुन यादव याने धर्मेंद्रसिंग यास शिवीगाळ करुन जेवन न देता घराबाहेर काढले .

सदर माहिती धर्मेंद्रसिंग याने त्याचे मित्रांना फोनवरुन सांगितले असता ते मिञ जाब विचारण्यास अर्जुन यादव याचे घरी आले . तेथे जाब विचारण्यास आलेल्या मिञ व अर्जुन यादव यांचेमध्ये वादावाद झाल्याने चिडुन अर्जुन यादव याने जाब विचारण्यास आलेल्या शिवम कैलासनारायण यादव यास छातीवर चाकु भोकसुन त्याचा खुन केला .

Google Ad

सदर बाबत चाकण पोलीस स्टेशन अंकित महाळुंगे पोलीस चौकी येथे गुन्हा रजि . नंबर ५० ९ / २०२२ , मा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच अर्जुन रामलखन यादव , वय २३ वर्ष , रा – बिष्णुपुरा , ता – भातपारानी , जि देवरीया , उत्तरप्रदेश . सदर आरोपीस गुन्हे शाखा युनिट ३ यांचे मदतीने गुन्हा घडल्यानंतर ०२ तासाचे आतमध्ये अटक करण्यात आली असुन त्याची मा . न्यायालय सो यांचेकडुन तपाास कामी पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे . मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा . अपर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे , मा . पोलीस उप – आयुक्त श्री . मंचक इप्पर , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार हे करीत आहेत .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!