Google Ad
Uncategorized

चिंचवड विधानसभा मतदार संघात २४ फेब्रुवारी पर्यंत उमेदवाराचा प्रचारावर किती झाला खर्च ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ फेब्रुवारी) : भारत निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी आज विहित वेळेत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

उमेदवारांच्या  दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी आज दि.२४ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली होती. तसे वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी, २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ, यांचे कार्यालय, “ग” क्षेत्रीय कार्यालय, ३रा मजला, थेरगाव, पुणे येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च तपासणी कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत.

Google Ad

भारत निवडणुक आयोग यांचे कार्यालय, निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक तपासणी केली जात आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीअंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता स्वतंत्र खर्च तपासणी कक्ष  स्थापन करण्यात आला असून, उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे. दरम्यान, उमेदवारांच्या  दैनंदिन खर्चाची पहिली दि. १५ फेब्रुवारी रोजी तर दुसरी तपासणी दि.२० फेब्रुवारी रोजी  पार पडली होती.  तिसरी तपासणी आज  सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी  सचिन ढोले यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून संकल्प सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लेखाधिकारी इलाही शेख  आणि त्यांच्या पथकाकडून उमेदवारांच्या निवडणूक खर्च तपासणीचे  काम केले जात असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक म्हणून आयकर अधिकारी प्रकाश हजारे  यांची नेमणूक करण्यात आली आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये इतकी आहे. मतदार संघामध्ये एकूण २८ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते, अशी माहिती  सचिन ढोले यांनी सांगितली.

चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने २४ फेब्रुवारी पर्यंत असा झाला उमेदवारांचा खर्च

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!